OLA E-scooter | ओलाने दिले दिवाळीसाठी विशेष गिफ्ट; या तारखेपासून सुरू होणार टेस्ट ड्राइव

जर तुम्ही ओला ई स्कूटर टेस्ट ड्राइवची वाट पाहत असाल तर, तुमच्यासाठी खुशखबर आहे

Updated: Oct 21, 2021, 03:33 PM IST
OLA E-scooter | ओलाने दिले दिवाळीसाठी विशेष गिफ्ट; या तारखेपासून सुरू होणार टेस्ट ड्राइव

मुंबई : जर तुम्ही ओला ई स्कूटर टेस्ट ड्राइवची वाट पाहत असाल तर, तुमच्यासाठी खुशखबर आहे. ओलाने घोषित केले आहे की, दिवाळीनंतर आपल्या ग्राहकांसाठी  S1 आणि S1 PRO इलक्ट्रिक स्कूटरची टेस्ट राइड देण्यासाठी तयार आहे. 10 नोव्हेंबरपासून टेस्ट राइड उपलब्ध होणार आहे. (Ola E-Scooter Test Ride)

पुन्हा करता येणार बुकिंग

ओलाची इलक्ट्रिक स्कूटर 15 ऑगस्टला लॉंच झाली आहे. कंपनीच्यामते फक्त 2 दिवसांत 1100 कोटी रुपयांहून जास्तचा ऑनलाईन व्यवहार झाला आहे. कंपनीला पहिल्या तासातच 600 कोटी रुपयांची बुकिंग मिळाली होती. आता या स्कूटर्सच्या बुकिंगचा दुसरा टप्पा 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. 

10 नोव्हेंबरला सुरू होणार टेस्ट ड्राइव

ओला इलेक्ट्रिकने म्हटले की, आम्ही एक निश्चित कालवधीत स्कूटर्सला ग्राहकांना सोपवण्यास तयार आहोत. कंपनी ग्राहकांना 10 नोव्हेंबरपासून ई स्कूटरची टेस्ट ड्राइव देण्याची योजना बनवित आहे. ओलाने म्हटले की, ई स्कूटर S1 PRO ची डिलिवरी करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

इतकी आहे किंमत

ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या S1 वेरिएंटची एक्स शोरूम किंमत 99,999 रुपये आहे. तर S1 PRO वेरिएंटची एक्स शोरूम किंमत 1 लाख 29 हजार आहे. याशिवाय ओला इलेक्ट्रिक स्कूटर निवडण्यासाठी 10 रंगांमध्ये पर्याय उपलब्ध आहेत. ही स्कूटर पूर्ण चार्जमध्ये 181 किमीपर्यंत धावू शकते. तर स्कूटरचा स्पिड 40 किमी प्रति तास इतका असणार आहे.