'हे काही मला जमायचं नाही...' काळजाचा ठोका चुकवणारा Video शेअर करत आनंद महिंद्रा यांनी बेधडकपणे सांगितलं

Anand Mahindra News : उद्योगक्षेत्र आणि त्यातही Auto क्षेत्रामध्ये भारताचा सर्वांगीण विकास करण्याच्या प्रवासात आनंद महिंद्रा आणि त्यांच्या महिंद्रा अँड महिंद्रा या उद्योग समूहाचा मोलाचा वाटा आहे.   

सायली पाटील | Updated: Jan 29, 2024, 12:03 PM IST
'हे काही मला जमायचं नाही...' काळजाचा ठोका चुकवणारा Video शेअर करत आनंद महिंद्रा यांनी बेधडकपणे सांगितलं  title=
businessman Anand Mahindra shares New Video of an adventure

Anand Mahindra News : उद्योगपती (Businessman) आनंद महिंद्रा हे त्यांच्या उद्योग जगतातील योगदानामुळं जितके चर्चेत असतात त्याहून जास्त चर्चा त्यांच्या समाजकार्याविषयी आणि त्यांच्या नव्या गोष्टींबद्दलच्या कुतूहलाविषयी होते. नव्या पिढीच्या कलानं घेणाऱ्या आणि सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा एका X पोस्टमुळं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. यावेळी नजरा वळवल्या म्हणण्यापेक्षा नजरा खिळवल्या आहेत असंच म्हणावं लागेल. त्याहूनही महिंद्रा यांनी अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. 

महिंद्रा यांनी अशी कोणती पोस्ट केली आहे? 

कायमच काही लक्षवेधी गोष्टींची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी यावेळी एक अफलातून व्हिडीओ आणि एक अद्वितीय थरार सर्वांसमोर आणला आहे. जो पाहताना शब्दश: काळजाचा ठोका चुकतोय. 

बंजी जम्पिंग, झिप लायनिंग या आणि अशा अनेक साहसी खेळांविषयी तुम्ही ऐकलं असेल. पॅराग्लायडिंग, स्काय डायविंग हेसुद्धा त्यातलेच. पण, महिंद्रा यांनी एक असा साहसी खेळ सर्वांपुढे आणला आहे जो पाहताना भल्याभल्यांचे हातपाय गळून पडत आहेत. 

महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाच्या (Mahindra Group) अध्यक्षस्थानी असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी यावेळी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काही मंडळी ढगांच्याही वर एका पॅराशूटला बांधलेल्या ट्रॅम्पोलिनवर इतक्या फुटांवर निर्धास्तपणे उड्या मारताना दिसत आहेत. कथाचीही तमा न बाळगता उड्या मारणारी हीच मंडळी कालांतरानं त्या ट्रॅम्पोलिनवरून चक्क कोलांट्या उड्या घेत खाली उड्या मारत आहेत. 

हेसुद्धा वाचा : Filmfare विजेत्या 12th fail चित्रपटातील स्टेटस ठेवता येतील असे दमदार डायलॉग

ट्रॅम्पोलिनवर बसून तिथं सेल्फी घेत, या क्षणाचा आनंद घेत हा थरार अनुभवणाऱ्या मंडळींना पाहून आनंद महिंद्रा यांनी काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या. 'हे असं काहीतरी करणं माझ्या बकेट लिस्टमध्ये अजिबातच नाही, मला हे जमणार नाही. पण, एरा आरामखुर्चीत बसून रविवारचा आनंद देणारा हा व्हिीडीओ किती कमाल आहे ना...' असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहित सुट्टीचा आनंद लुटत असल्याचंही अप्रत्यक्षपणे सांगितलं. 

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर अतिशय झपाट्यानं व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 453.5K व्ह्यूज मिळाले असून, त्यावर अनेक लाईक्स आणि कमेंटही आल्या आहेत. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला का? पाहिला असेल तर, असा एखादा साहसी खेळ खेळण्याच्या विचारात तुम्ही आहात का? कमेंटमध्ये सांगा.