पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल

Updated: May 14, 2018, 11:55 PM IST

नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकांच्या निकालापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अर्थखात्याचा प्रभारी कारभार केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

स्मृती इराणींकडून माहिती प्रसारण खातं काढून राज्यवर्धन राठोड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे अर्थखात्याचा प्रभारी कारभार सोपवण्यात आला आहे. अरुण जेटली यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल

प्रभारी अर्थमंत्रीपदी पियुष गोयल 

स्मृती इराणींकडून माहिती-प्रसारण खातं काढलं

राज्यवर्धन राठोड- माहिती, प्रसारणं मंत्रालय 

स्मृती इराणींकडे केवळ वस्त्रोद्योग खातं

पियुष गोयल यांच्याकडे तीन खाती