close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मद्यपी चालकाने लोकांना उडवलं, थरारक दृष्य सीसीव्हीत कैद

अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Updated: Aug 19, 2019, 12:36 PM IST
मद्यपी चालकाने लोकांना उडवलं, थरारक दृष्य सीसीव्हीत कैद

बंगळुरु : बंगळुरुमधील एका अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कारचा चालक नशेत असल्याचं उघड झालं आहे. एचएसआर लेआऊटमध्ये हे लोक उभे असताना अचानक या मद्यपीनं कार त्यांच्या अंगावर घातली. लोकांना काही कळायच्या आतच त्यांना या कारने धडक दिली. जखमींचा नेमका आकडा कळला नसला तरी दृ्श्य पाहता किमान ४ ते ५ जण यात जखमी झाले आहेत. 

या मद्यपी कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे.