श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्या घराच्या परिसरात घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीला शनिवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले. कारमधून आलेल्या या व्यक्तीने बॅरिकेटस् सोडून येथील व्हीव्हीआयपी परिसरात प्रवेश केला. मात्र, सतर्क असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांनी लगेच त्याच्यावर गोळीबार केला. यामध्ये हा व्यक्ती मृत पावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, हा आत्मघाती हल्ला होता का, याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही.
Man gunned down by security personnel when he was trying to enter former #JammuAndKashmir Chief Minister Farooq Abdullah's residence in Jammu in a car; more visuals from the spot pic.twitter.com/hf8ecJA7HC
— ANI (@ANI) August 4, 2018