मारुती पुन्हा बादशाह, विक्रीत पुन्हा नवा रेकॉर्ड

देशातील सर्वाधिक कार विक्री करणाऱ्या मारुती सुझुकीने विक्रीच्या बाबतीत नवा रेकॉर्ड बनवलाय. 

Updated: Jun 1, 2018, 05:01 PM IST
मारुती पुन्हा बादशाह, विक्रीत पुन्हा नवा रेकॉर्ड title=

मुंबई : देशातील सर्वाधिक कार विक्री करणाऱ्या मारुती सुझुकीने विक्रीच्या बाबतीत नवा रेकॉर्ड बनवलाय. ऑटोमॅटिक ट्रान्समिनशनच्या ३ लाखाहून अधिक कार भारतात विक्री झाल्याची घोषणा मारुतीकडून करण्यात आलीये. कंपनीकडून पहिल्यांदा सेलेरिओ हॅचबॅकचे ऑटोमॅटिक मॉडेल २०१४मध्ये लाँच करण्यात आले होते. जपानी कार निर्माता कंनपनी सध्याच्या घडीला ७ मॉडेलचे ऑटोमॅटिक व्हर्जनची विक्री करतेय. सध्या मारुतीच्या ज्या कारमध्ये एएमटी व्हर्जन उपलब्ध आहे त्यात ऑल्टो K10, वॅगॅनार, सिलेरिओ, स्विफ्ट, इग्निस, डिझायर आणि व्हिटारा ब्रिझा यांचा समावेश आहे. एएमटी गिअरबॉक्स खरेदीदारांमध्ये प्रसिद्ध आहे. दरम्यान एएमटी मॉडेलमध्ये ४३ टक्के सेलेरिओची विक्री झालीये. तर २८ टक्के इग्निस आणि १७ टक्के डिझायरची विक्री झालीये.

कंपनीकडून असाही दावा करण्यात आलीये की एएमटी मॉडेलची विक्री २०१७-१८मध्ये २-१४-१५च्या तुलनेने तीनपट वाढलीये. मारुतीने २०१८-१९मध्ये दोन लाखाहून अधिक ऑटोमॅटिक कार विकण्याचे लक्ष्य ठेवलेय. 

ऑटो गिअर शिफ्ट टेक्नोलॉजी लांबच्या प्रवासासाठी ड्रायव्हरला आराम देण्यासाठी फ्युअल इफिशियंट आहे. ग्राहकांमध्ये ट्रान्समिशन वेगाने लोकप्रिय होतंय. पाच वर्षांत एएमटी टेक्नोलॉजी असलेल्या ३ लाख कारची विक्री झाली. पुढील आर्थिक वर्षात मारुतीने दोन लाख कारच्या विक्रीचे लक्ष्य ठेवलेय.