नवी दिल्ली : आता देशाच्या नागरिकांप्रमाणेच गायींनाही ओळखपत्राचा आधार लाभणार आहे.
तस्करी रोखण्यासाठी सरकारनं आता गायी आणि गोवंशांना ओळखपत्र जारी करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत देशातल्या ८५ लाख गायीची ओळखपत्रे तयार करण्यात आली असून त्यांना टॅगही चिकटवण्यात आलंय.
सध्या केवळ दुधाळ गायींवर लक्ष केंद्रीय करण्यात आलंय. पुढच्या टप्प्यात बैल आणि वळुंनाही ओळखपत्र देऊन टॅग लावण्यात येणार आहे. बांग्लादेशाच्या सीमेवरून मोठ्या प्रमाणावर जनावरांची तस्करी केली जाते.
गेल्या वर्षभरात बांग्लादेशच्या सीमेवर १ लाख ६८ हजार जनावरं तस्करीविरोधातल्या कारवाईत पकडली गेली होती. ही तस्करी रोखण्यासाठीच ओळपत्र आणि टॅग लावण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं सरकारतर्फे सांगण्यात आलंय.