मुंबई : 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न भरण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. यादरम्यान केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) मोठा दिलासा दिला आहे. CBDT ने आर्थिक वर्ष 2020-21 साठी ई-फाइल केलेल्या ITR च्या व्हेरिफिकेशन अंतिम मुदत वाढवली आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने ITR च्या व्हेरिफिकेशनची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. आयकर रिटर्नची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला E-Verify करणे आवश्यक आहे. अन्यथा आयटीआर अवैध मानला जातो.
आर्थिक वर्ष 2020-21 साठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. सर्व करदात्यांनी 31 डिसेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे.