गुजरातच्या रणसंग्रामाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार

एकीकडे गुजरातचा रणसंग्राम रंगला असताना राजधानी दिल्लीत उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झालीये.

Updated: Dec 14, 2017, 11:48 PM IST
गुजरातच्या रणसंग्रामाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार title=

नवी दिल्ली : एकीकडे गुजरातचा रणसंग्राम रंगला असताना राजधानी दिल्लीत उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झालीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्येही गुजरातमधल्या गरमागरम वादाचे सूर उमटलेत.

हिवाळी अधिवेशनात अधिकाधिक कामं मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विरोधकांना केलंय. त्याच वेळी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र व्हाव्यात, यासाठीही मोदींनी बॅटिंग केली. अर्थात, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर केलेल्या विधानावर माफी मागण्याची मागणी विरोधकांनी यावेळीही लावून धरलीये. याखेरीज नोटाबंदी, GST अशी काही महत्त्वाची हत्यारंही विरोधकांच्या भात्यात आहेत. त्यामुळे संसदेचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.