FD Rates Hike: 'या' Bank ने खातेदारकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे

Bank Privatization : आपली बचत आणि त्यावर मिळणारे व्याज सुरक्षित ठेवण्यासाठी लोक त्यांच्या कष्टाचे पैसे फिक्स्ड डिपॉझिट करतात. बँकिंग भाषेत याला मुदत ठेव (एफडी) म्हणतात. आता या मुदत ठेवीवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (CBI) ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. या बँकांनी दोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर (एफडी) व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. 

Updated: Sep 16, 2022, 08:50 AM IST
FD Rates Hike: 'या' Bank ने खातेदारकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे  title=

Central Bank of India:  सरकारकडून काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करण्याचे काम सुरू आहे. अलीकडेच, DIPAM चे सचिव तुहिन कांत पांडे यांनी IDBI बँकेबाबत एक निवेदन दिले. IDBI Bank च्या खाजगीकरणासाठी लवकरच गुंतवणूकदारांकडून बोली मागविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. (central bank of india increased fd rates)

याशिवाय आणखी दोन बँकांच्या खासगीकरणाचे (Privatization ) प्रकरण चव्हाट्यावर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन सरकारी अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, कॅबिनेटची शिक्कामोर्तब लवकरच होऊ शकते.

व्याजदर वाढवून ग्राहकांना दिलेली भेट

याचदरम्यान  सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) आणि इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) यांचे खाजगीकरण होणे अपेक्षित आहे. मात्र खासगीकरणापूर्वीच सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (Central Bank of India) मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करून ग्राहकांना एक भेट दिली आहे. वास्तविक, आरबीआयने (RBI) रेपो दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर बँकेने (bank) व्याजदरात (Interest rates) वाढ केली आहे.

नवे दर 10 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ( Central Bank of India) दिलेल्या माहितीनुसार, 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर (FD) व्याजदर वाढवण्यात आला आहे. व्याजदरात बदल झाल्यानंतर 60 दिवसांपासून ते 5 वर्षांपर्यंतच्या FD वर पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळेल. बँकेने 3 ते 5 वर्षांच्या FD वरील व्याजदरात 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. त्यानंतर ते आता 5.50 टक्के झाले आहे. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार नवे दर 10 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.

वाचा : Petrol-Diesel होणार इतके स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

बँकेने देऊ केलेले नवीन दर

व्याजदरात बदल झाल्यानंतर 7 ते 14 दिवसांच्या FD वर 2.75 टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, 15 ते 30 दिवसांच्या एफडीवर 2.90 टक्के व्याज आहे. त्याचप्रमाणे 31 ते 45 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के, 46 ते 59 दिवसांच्या एफडीवर 3.35 टक्के, 60 ते 90 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के आणि 91 ते 179 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4 टक्के व्याज मिळेल.

आता 180 ते 270 दिवसांच्या FD वर 4.65 टक्के, 271 ते 364 दिवसांच्या FD वर 4.75 टक्के, 1 वर्ष ते 2 वर्षांच्या FD वर 5.45 टक्के, 2 ते 3 वर्षांच्या FD वर 5.50 टक्के आणि 3 वर्षे ते 5 वर्षांच्या FD वर 5.50 टक्के व्याजदर आहे. टक्के व्याज मिळेल. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून (Central Bank of India) 5 ते 10 वर्षांच्या एफडीवर 5.60 टक्के व्याज मिळेल.