खाद्य तेलावरील करामध्ये कपात; केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा

सणासुदीच्या दिवसांमध्ये खाद्य तेलाचा वापर वाढतो. 

Updated: Oct 14, 2021, 12:24 PM IST
खाद्य तेलावरील करामध्ये कपात; केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा title=

मुंबई : सणासुदीच्या दिवसांमध्ये खाद्य तेलाचा वापर वाढतो. परंतु सध्याच्या महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकारने सर्व सामान्यांना दिलासा देण्यासाठी पाम आणि सुर्यफूल तेलावरील कृषी उपकर (Agri Cess)आणि सीमा शुल्कात (Custom Duty) कपात केली आहे. याआधी उपभोक्ता मंत्रालयाने तेल आणि तिलहनवर साठ्याच्या मर्यादेचा आदेश जारी केला होता. साठ्याची मर्यादा 31 मार्च 2022 पर्यंत लागू असणार आहे. राज्यांना आदेशाचे सक्तीने पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आयात शुल्कात एवढी कपात
 

तेल कपात केल्यानंतर कराची टक्केवारी   आधीचा कर
क्रुड पाम तेल  8.25%   24.75%
RBD पाम तेल 19.25 35.75
क्रूड सोया तेल 5.5 24.75
रिफाइंड सोया तेल  19.5   35.75
क्रूड सुर्यफूल तेल  5.5  24.75
रिफाइंड सुर्यफूल तेल 19.25 35.75

 सरकारच्या निर्णयानंतर खाद्य तेलांमध्ये साधारण 15 रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे.

केव्हा निर्णय लागू होणार 
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डने अधिसूचनेत म्हटले आहे की, शुल्कात कपात 14 ऑक्टोबरपासून प्रभावी होईल आणि 31 मार्च 2022 पर्यंत लागू असेल. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.