'एका रात्रीत असं काय घडलं की शिवसेनेने विधेयकाला पाठींबा दिला नाही ?'

सत्तेसाठी लोक कसे रंग बदलतात ते पहा असा टोला अमित शाह यांनी राज्यसभेत लगावला. 

Updated: Dec 11, 2019, 08:10 PM IST
'एका रात्रीत असं काय घडलं की शिवसेनेने विधेयकाला पाठींबा दिला नाही ?' title=

मुंबई : नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत पारित झाले. याला शिवसेनेने पाठींबा दिला. काँग्रेसने शिवसेनेच्या या भूमिकेवर जोरदार टीका केली. या विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा झाली. तिथेही सभात्याग शिवसेनेने सभात्याग केला. यावरून राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याप्रकरणी शिवसेनेला टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेने सांगावे की रात्रीत काय घडलं की शिवसेनेने राज्यसभेत विधेयकाला पाठिंबा का दिला नाही ? असा प्रश्न अमित शाह यांनी उपस्थित केला आहे. 

Image result for amit shah rajya sabha zee news

या विधेयकाला विरोध करणारे देशद्रोही आहेत असे आम्ही कधीच म्हटले नव्हते. सत्तेसाठी लोक कसे रंग बदलतात ते पहा असा टोला अमित शाह यांनी राज्यसभेत लगावला. 

आम्ही राज्यसभेत नागरिकत्व विधेयकाला समर्थन देणार नाही, असे स्पष्ट केले. मी राज्यसभा सदस्यांकडून याची माहिती मागवली आहे. त्यावर विचार करुन अधिकची भूमिका स्पष्ट करेन असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

आमच्यासारखे सर्वच पक्ष देशहित डोळ्यासमोर ठेवून काम करतील. या विधेयकाबाबत अधिक स्पष्टता येणे आवश्यक आहे. राज्यसभेत हे विधेयक मांडले जाण्यापूर्वी त्यामध्ये सूचवलेल्या सूचनांची दखल घेणे आवश्यक आहे. तसेच अधिक स्पष्टता येत नाही तोवर राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार नसल्याचेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम विचारधारांसाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र, नागरिकत्व सुधारणा विधेयक हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशहितासाठी आणण्यात आले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीयत्वाला धरुन ते असल्याने शिवसेनेने याला पाठींबा दिला आहे, असेही ते म्हणाले होते.