ऑफिसमध्ये कधी सीईओ 'मुकाबला' गाण्यावर डान्स करताना पाहिले आहे का? पाहा VIDEO

कार्यालयांमध्ये बऱ्याचदा दबावाखाली किंवा तणावाखाली काम करत असतांना तुम्ही कर्मचार्‍यांना पाहिले असेल, पण आज व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

Updated: Feb 19, 2020, 08:06 PM IST
ऑफिसमध्ये कधी सीईओ 'मुकाबला' गाण्यावर डान्स करताना पाहिले आहे का? पाहा VIDEO
Pic Courtesy : twitter@DipaliGoenka

मुंबई : कार्यालयांमध्ये बऱ्याचदा दबावाखाली किंवा तणावाखाली काम करत असतांना तुम्ही कर्मचार्‍यांना पाहिले असेल, पण आज व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या व्हिडिओमध्ये वेलस्पन इंडिया लिमिटेडच्या ​​सीईओ डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत कार्यालयातील कर्मचारीही डान्स करताना दिसत आहेत. या डान्सनंतर ऑफिसमधील वातावरण आनंदी झाल्याचे दिसून आले.

हा व्हिडिओ आरपीजी एंटरप्रायजेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक सोशल मीडियावर त्याचे कौतुक करीत आहेत आणि लोक म्हणत आहेत की, ऑफिसचे वातावरण असेच असले पाहिजे जेणेकरून कर्मचारी दबाव न घेता अधिक आऊटपुट देऊ शकतात. तसाच प्रयत्न वेलस्पन इंडिया लिमिटेडच्या ​​सीईओ दीपाली गोयंका यांनी केला आणि तो सर्व कर्मचाऱ्यांना आवडला. त्यामुळे या डान्सनंतर तेथील वातावरण आनंदी झाल्याचे दिसून आले.

मजेशीर गोष्ट म्हणजे वेलस्पन इंडिया लिमिटेडच्या सीईओ दीपाली गोएंका यांनी 'मुकाबला' या गाण्यावर डान्स केला. त्याच्यासोबत कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही या डान्सचा ठेका धरला आणि मनधुंद नाच केला. धम्माल, मज्जा आणि मस्ती असेच काहीवेळ कार्यालयात वातावरण दिसून आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि लोकंही या व्हिडिओला अधिक लाईक करत आहेत.