राजस्थान : मेच्या भीषण उन्हात अचानक आलेल्या वादळामुळे शेकडो जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेश, राज्यस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि दिल्लीमध्ये धुळीचे वादळ आले. आजदेखील उत्तराखंड आणि जवळच्या भागात पुढच्या १२ तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. वातावरण यंत्रणेचा वेगळा मेळ झाल्याने हे वादळ आल्याचे मत वैज्ञानिकांनी मांडले आहे. एरवी येणाऱ्या वादळांपेक्षा हे वेगळ आहे. राज्यस्थान, पंजांब आणि हरियाणाच्या वर चक्रीवादळ बनलं. यातून गरजणारे ढग बनले, जे उ.प्रदेशकडुन बिहारपासून बंगालपर्यंत पोहोचले. उत्तरी पाक आणि जम्मू कश्मीरच्या दिशेने येणारे कोरडे चक्रीवादळात मिळाले.
तापमान जास्त असल्याने काहीवेळातच वादळाचे वातावरण निर्माण झालं. ९० टक्क्याहून जास्त हवा कोरडी असल्यासहवा मोठ्या प्रमाणात पोहोचण हे सर्रास होतं. राज्यस्थान आणि उ.प्रदेशमध्ये धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. १ मेच्या रात्री आलेल्या वादळात साधारण १२३ जणांचे बळी गेले. एकट्या आग्र्यात ४३ तर राज्यस्थानमध्ये ३८ बळी या वादळामुळे गेले. मालमत्ता आणि जिवितहानीच मोठ नुकसान यामुळे पाहायला मिळत आहे.