Chandrayaan 3 Location: संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेवर आहे. चांद्रयान 3 मोहिमेबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. चांद्रयान 3 ने तिसऱ्या कक्षेतून चौथ्या कक्षेत प्रवेश केला आहे. हा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जात आहे. कारण हा टप्पा पार केल्यानंतर चांद्रयान 3 चा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु होणार आहे. या टप्प्यातील 25 जुलै अत्यंत महत्वाचा दिवस आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सोशल मिडियाच्या माध्यमातून चांद्रयान 3 बाबतची सर्व अपडेट जाहीर करत आहे. चांद्रयान-3 ची चौथी कक्षा यशस्वीरित्या बदलण्यात आली आहे. यापूर्वी, 18 जुलै रोजी, इस्रोने चांद्रयान-3 तिसऱ्या कक्षेत आणण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली होती. आता यानंतर 25 जुलै 2023 रोजी दुपारी 2 ते 3 या वेळेत चौथी कक्षा पार पडणणार आहे. यामुळे 25 जुलै अत्यंत महत्वाचा दिवस मानला जात आहे. कारण यानंतर चांद्रयान-3 पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये असलेल्या कक्षेतून थेट चंद्राच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
चांद्रयान-3 सध्या अंडाकृती कक्षेत पृथ्वीभोवती घिरट्या घालत आहे. पृथ्वीभोवतीच्या तीन कक्षांचा टप्पा पार करुन चांद्रयान-3 ने चौथ्या कक्षेत प्रवेश केला आहे. चांद्रयान 3 हे 51,400 किमीच्या अपोजीसह पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहे. 31 जुलैपर्यंत चांद्रयान-3 एक लाख किलोमीटरच्या कक्षेत नेण्याचे इस्रोच्या शास्त्रज्ञांचे लक्ष्य आहे. यानंतर चांद्रयान-3 पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.
14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावल आहे. चांद्रयानाच्या प्रक्षेपणानंतर सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत आहेत. 5 ते 6 ऑगस्टदरम्यान चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. अंडाकृती आकारात घिरट्या घालत चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेने मार्गक्रमक करेल. यानंतर चंद्राजवळच्या दीर्घ वर्तुळाकार कक्षेत यान स्थिरावेल. 23-24ऑगस्ट दरम्यान लँडर चंद्रावर उतरेल. 42 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्रावर पोहोचेल. 23 ऑगस्टला चांद्रयानाची गती कमी होईल. चंद्र 100 किमीच्या कक्षेत आल्यानंतर, लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळं केलं जाईल आणि त्यानंतर लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होईल हा टप्पा ISRO च्या शास्त्रज्ञांसाठी अत्यंत अव्हानात्मक टप्पा असणार आहे. विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल.