मुंबई : RBI Cardless Withdrawals Rule: बातमी तुमच्या कामाची. ATM मधून पैसे काढण्याची पद्धतीत बदल करण्यात आला आहे. डिजिटल व्यवहारांच्या युगात एटीएममधून (ATM) पैसे काढणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. जर तुम्ही अनेकदा एटीएममधून पैसे काढत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) बँका आणि एटीएम ऑपरेटरना एटीएममधून कार्डलेस पैसे (Cardless withdrawal from ATM) काढण्याचे आदेश दिले आहेत.
आरबीआयचा हा नियम लागू झाल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. याचा फायदा असा होईल की कार्ड क्लोनिंग, कार्ड स्किमिंग आणि इतर बँक फसवणूक कमी होईल. कार्डलेस व्यवहारात पैसे काढण्यासाठी तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट कार्डची गरज भासणार नाही. यामध्ये तुम्ही पेटीएम, गुगल पे, अॅमेझॉन पे किंवा फोनपे सारख्या UPI पेमेंट अॅप्सद्वारेच एटीएममधून पैसे काढू शकाल.
आरबीआयच्या सूचनेनंतर आता सर्व बँका आणि एटीएम ऑपरेटरना कार्डलेस कॅश काढण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या नियमांनुसार कोणतीही बँक कोणत्याही बँकेच्या खातेदाराला ही सुविधा देऊ शकते. यासाठी NPCI ला UPI इंटिग्रेशनच्या सूचना मिळाल्या आहेत.
एटीएम कार्डवर सध्या आकारले जाणारे शुल्क बदलानंतरही तेच राहतील. यामध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत. याशिवाय, कॅशलेस व्यवहारातून पैसे काढण्याची मर्यादा (रोख पैसे काढण्याचे नियम) देखील पूर्वीप्रमाणेच राहील.
कार्डलेस व्यवहाराची सुविधा सध्या फक्त काही बँकांच्या एटीएममध्ये उपलब्ध आहे. नवीन प्रणालीनुसार, ग्राहकाला यापुढे एटीएममध्ये डेबिट कार्ड टाकण्याची गरज नाही. यासाठी ग्राहकाला एटीएममध्ये क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर 6 अंकी UPI टाकल्यानंतर पैसे बाहेर येतील.
कॅशलेस कॅश काढण्याची प्रणाली लागू करण्यामागील RBI चा उद्देश वाढत्या फसवणुकीच्या घटना कमी करणे हा आहे. यामुळे कार्ड क्लोनिंग, कार्ड स्किमिंग आणि इतर बँक फसवणूक कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच, पैसे काढण्यासाठी तुम्हाला कार्डची गरज भासणार नाही.