भीषण अपघात! भरधाव ट्रकची स्कूल ऑटोला जोरदार धडक, 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू

हा अपघात इतका भीषण होता की ऑटोच्या अक्षरश: चिंधड्या उडल्या. या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आलं आहे 

Updated: Feb 9, 2023, 07:07 PM IST
भीषण अपघात! भरधाव ट्रकची स्कूल ऑटोला जोरदार धडक, 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू

Accident : भीषण अपघातात आठ शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची हादरवणारी घटना समोर आली आहे. शालेय विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑटो रिक्षाला एक भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अने विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. छत्तीसगडमधल्या कोरर भागात हा भीषण अपघात झाला. 

ट्रकची धडक इतकी भीषण होती की ऑटो रिक्षाच्या अक्षरश: चिंधड्या झाल्या. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं. बघ्यांचीही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.  घटनास्थळी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकच हंबरडा फोडला.