खुशखबर : मदर डेअरीचं टोकन दूध ४ रुपयांनी स्वस्त

मदर डेअरीचा स्तुत्य उपक्रम 

Updated: Oct 1, 2019, 07:56 AM IST
खुशखबर : मदर डेअरीचं टोकन दूध ४ रुपयांनी स्वस्त title=

मुंबई : प्लास्टिक बंदीच्या मोहिमेला सहकार्य देण्याकरता मदर डेअरीने पुढाकार घेतला आहे. आज 1 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. या मोहिमेला सपोर्ट म्हणून हा निर्णय मदर डेअरीने घेतला आहे. 

मदर डेअरीचं टोकन घेऊन मिळणारं दूध हे पॅकेट दूधाच्या तुलनेत 4 रुपयांनी प्रति लीटर स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. मदर डेअरीच्या प्रमुखांनी सांगितल्यानुसार, टोकन दूधाची अधिक विक्री व्हावी या दृ्टीकोनातून कंपनीकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जीवनात आपण प्लास्टिकचा वापर टाळावा याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे. 

टोकन दूध घेण्याकडे ग्राहकांनी सर्वाधिक कल दाखवला तर प्लास्टिकचा वापर कमी होईल आणि पर्यावरणाला त्याचा फायदा होईल. कंपनी रिटेल सेल आऊटलेट्समध्ये वेंडिंग मशिनच्या माध्यमातून हा सुविधा देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे मदर डेअरी टोकन दुधाची मागणी वाढणार आहे. याची पूर्वतयारी म्हणून कंपनीने दिवसाला 10 लाख लीटर दूध प्रति दिवस वाढवलं आहे. खूप मोठ्या संख्येत लोकं टोकन दूधाची खरेदी करतील यात शंका नाही. 

या प्रकारची मोहिम ही दिल्ली, गुरगाव, नॉयडा, फरिझाबाद आणि गाझियाबाद या शहरांमध्ये देखील राबवण्यात येणार आहे. दररोज मदर डेअरीमार्फत 6 लाख दूधाची विक्री 900 बूथवर होत असते. यामार्फत दरवर्षाला 90 करोड रुपयांची उलाढाल होते. 

कंपनीने वेंडिंग मशिनद्वारे दुधाची विक्री केल्यानंतर यामध्ये आता आणखी वाट होण्याची शक्यता आहे. तसेच प्लास्टिक मुक्तचा विचार करता ग्राहक एका लीटरमागे 4.2 ग्रॅम प्लास्टिक निर्मिती टाळणार आहे. यातून वर्षाला 900 मिलियन टन प्लास्टिक निर्मिती रोखता येणार आहे, अशी माहिती मदर डेअरीचे सहाय्यक संचालक संग्राम चौधरी यांनी दिली.