नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय पोस्ट खात्यात भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
भारतीय पोस्ट खात्यातर्फे विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. ही सर्व भरती प्रक्रिया 'ग्रामीण डाकसेवक' या पदासाठी करण्यात येत आहे. छत्तीसगड पोस्टल सर्कलमध्ये रिक्त पदांसाठी वेगवेगळ्या सहा विभागांत भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
छत्तीसगड पोस्टल सर्कलमध्ये २४९२ ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. यापैकी १२०१ पद खुल्या प्रवर्गासाठी, १२७ पद ओबीसी, २८९ पद एससी आणि ७७६ पद एसटी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली आहेत.
बस्तर : ११०१
बिलासपूर : २०९
दुर्ग : ६२३
रायगढ : २५३
रायपूर : २७७
आरपी : १३
या पदासाठी उमेदवार हा केवळ दहावी पास असायला हवा. म्हणजेच १०वी पास असलेल्या तरुणांसाठी नोकरी मिळविण्याची ही एक सुवर्णसंधीच आहे.
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं कमीत कमी वय १८ वर्ष आणि अधिकाधिक वय ४० वर्ष असावं. नियमांनुसार, वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.
खुला प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी, एसटी उमेदवारांना कुठल्याही प्रकारचं शुल्क द्यावं लागणार नाही.
छत्तीसगड पोस्टल सर्कलमध्ये ग्रामीण डाक सेवक या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुकांनी www.appost.in किंवा www.indiapost.gov.in वर २० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात.