दाऊदचा हस्तक छोटा शकीलचा मुलगाही अध्यात्माच्या वाटेवर

.....

दाऊदचा हस्तक छोटा शकीलचा मुलगाही अध्यात्माच्या वाटेवर

नवी दिल्ली: देशविघातक आणि अनेक दहशतवादी कारवायांचा प्रमुख सूत्रधार तसेच, अनेक गुन्हेगारांचा म्होरक्या गुंड दाऊद इब्राहिम याचा मुलगा मौलाना झाल्याची बातमी आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आणखी एकदा अशीच बातमी येत आहे. दाऊद इब्राहिमचा विश्वासू हस्तक अशी ओळक असलेल्या छोटा शकीलचा मुलगाही आध्यात्माच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे दाऊद आणि शकील या कुप्रसिद्ध गुन्हेगारांपुढे आपल्या काळ्या साम्राज्याचा पुढचा वारस कोण? हा प्रश्न उभा ठाकला आहे.

दाऊद नैराश्येत

ठाणे पोलिसांनी काही महिन्यांपूर्वीच इक्बाल कासरक याला खंडणीच्या प्रकरणात अटक केली. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत इक्बालने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. दरम्यान, मुलाने अध्यात्मिक पाऊल टाकल्यावर दाऊद बराच नाराज झाला होता. अलिकडे, तो वारंवार नैराश्येत जात असल्याचेही वृत्त मध्यंतरी आले होते. दरम्यान, छोटा शकीलवरही अशीच वेळ आली आहे. त्याच्याही मुलाने इस्लामसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या कुराण पठणात अव्वल स्थान पटकावले आहे. शकीलच्या मुलालाही अध्यात्मात विशेष आवड आहे. 

छोटा शकील कौटुबिक स्थिती

सूत्रांकडील माहितीनुसार, छोटा शकीलला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. लोकसत्ता डॉट. कॉमने याबाबत वृत्त दिलेलेल्या वृत्तानुसार, मुलाचे नाव मोबासीर शेख (वय १८) असे असून, तो सध्या शिक्षण घेत आहे. पण, त्याला वडिलांच्या धंद्यात तीळमात्रही स्वारस्य नाही. त्यामुळेच त्याने वडिलांच्या कृत्यात सहभागी होण्यापेक्षा अध्यात्माची वाट धरल्याचे गुन्हेगारी वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, शकीलच्या दोन्ही मुली झोया व अनाम  या विवाहित आहेत.