राहुल गांधी काँट्रॅक्ट किलर, भाजपचा पलटवार

संघाची विचारधारा ही अरब राष्ट्रांत असलेल्या कट्टर मुस्लिमवाद्यांच्या संघघटनेसारखीच

Updated: Aug 24, 2018, 10:53 PM IST
राहुल गांधी काँट्रॅक्ट किलर, भाजपचा पलटवार title=

नवी दिल्ली: राहुल गांधी हे काँट्रॅक्ट किलर असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी शुक्रवारी लंडन येथील कार्यक्रमात भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाची रचनाच बदलण्याच्या प्रयत्नात आहे. संघ वगळता देशातील इतर कोणत्याही संघटनेला देशाच्या स्वायत्त संस्थांवर नियंत्रण ठेवावेसे वाटत नाही. संघाची विचारधारा ही अरब राष्ट्रांत असलेल्या कट्टर मुस्लिमवाद्यांच्या संघटनेसारखीच (मुस्लिम ब्रदरहुड) आहे, असा आरोप राहुल यांनी केला होता. 

या टीकेला प्रत्युत्तर देताना सांबित पात्रा यांनी म्हटले की,  राहुल गांधी हे भारत नावाच्या संकल्पनेचे काँट्रॅक्ट किलर म्हणजे सुपारी घेऊन खून करणारे मारेकरी आहेत.