सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी घेतला सुप्रीम कोर्टाचा निरोप

न्यायाधीश म्हणून कामकाजाचा त्यांचा अखेरचा दिवस होता.

Updated: Nov 15, 2019, 11:48 PM IST
सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी घेतला सुप्रीम कोर्टाचा निरोप title=

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा आज पदावरील अखेरचा दिवस असल्याने त्यांना आज सुप्रीम कोर्टाच्या आवारात शुभेच्छा देण्यात आल्या. १७ नोव्हेंबर रोजी ते निवृत्त होत आहेत. पण आज न्यायाधीश म्हणून कामकाजाचा त्यांचा अखेरचा दिवस होता. १८ नोव्हेंबरला न्यायमूर्ती शरद बोबडे हे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत.

रंजन गोगोई यांची २८ फेब्रुवारी २००१ साली गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली होती. गोगोई पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीही होते. १२ फेब्रुवारी २०११ला गोगोईंना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आलं होतं. एप्रिल २०१२ मध्ये गोगोई सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले होते.

आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांचा निकाल लावला. १३ महिन्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदाचा पदभार सांभाळणाऱ्या गोगोईंनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. 

त्यांपैकी एक म्हणजे राफेल लढाऊ विमान, अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात असलेली राम जन्मभूमी त्याचप्रमाणे शबरीमाला मंदिराच्या सुनावनीची जबाबदारी आता सात न्यायाधीशांच्या खांदयावर सोपवली आहे. 

अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचवेळी मुस्लिमांना पर्यायी जागा देण्याचा निर्णयही न्यायालयाने दिला आहे. तर मुस्लिमांना मशिदीसाठी वेगळी जमीन देण्यात आली आहे.