मुख्यमंत्री केजरीवालांना मुलीच्या अपहरणाची धमकी

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांची मुलगी हर्षिताच्या अपहरणाची धमकी देण्यात आली आहे.

Updated: Jan 13, 2019, 01:35 PM IST
मुख्यमंत्री केजरीवालांना मुलीच्या अपहरणाची धमकी title=

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांची मुलगी हर्षिताच्या अपहरणाची धमकी देण्यात आली आहे.  मुख्यमंत्री कार्यालयात तीन दिवसांपूर्वी हा ईमेल पाठवण्यात आला आहे. यानंतर हर्षिताच्या सुरक्षेसाठी पीएसओ (पर्सनल सेफ्टी ऑफिसर) तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून नागरी लाइंन्स ठाण्यात यासंदर्भात तक्रार केली आहे. याचा तपास स्पेशल सेलकडे देण्यात आला आहे. धमकीच्या ईमेलनंतर आणखी एक ईमेल आला. त्यामध्ये  हा ईमेल खोटा असल्याचा सांगण्यात आले. दिल्ली पोलिसांना ईमेल पाठवणाऱ्याचा अद्याप शोध लागला नाही.

याआधी अनेकदा केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. 2016 मध्ये दिल्ली पोलिसांच्या एमरजेंसी नंबर 100 वर फोन आला आणि त्यात केजरीवालांना जीवे मारण्याची धमकी होती. त्यानंतर 2016 मध्ये मुख्यमंत्री कार्यलयात ईमेल पाठवून आणखी एक धमकी देण्यात आली. दिल्ली सरकारने या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात केली आहे. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल ही IIT ( India Institute of Technology Delhi) मधून शिक्षण पूर्ण केले आहे. अरविंद केजरीवाल हे देखील आयआयटीयन आहेत. त्यांनी आयआयटी खडगपूर येथुन इंजीनियरींगचे शिक्षण घेतले आहे. राजकारणात येण्यापूर्वी केजरीवाल यांनी आयआरएसची परिक्षा देखील पास केली होती.