नवी दिल्ली : चौकीदार चोर है हे कॅम्पेन काँग्रेसतर्फे चालवण्यात येत आहे. पण या विधानामुळे राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. 'चौकीदार चोर है' या विधानाचे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्याकडे मागितले आहे. भाजपा खासदार मीनाक्षी लेखींच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. राफेल करारात अंबानींच्या कंपनीसोबत करार करण्यात पंतप्रधानांचा पुढाकार होता. हे सर्व नियमबाह्य आणि हेतुपूर्वक पद्धतीने केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता.
Supreme Court issues notice to Congress President Rahul Gandhi in connection with a contempt petition filed against him. Supreme Court has sought an explanation from him. (file pic) pic.twitter.com/QZBtnbdLEL
— ANI (@ANI) April 15, 2019
यावेळी चौकीदार ही चोर है असे वक्तव्य त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केले होते. तेव्हा या वाक्यावर इतका गदारोळ झाला नाही. त्यानंतर काँग्रेसने सोशल मीडियात हे कॅम्पेन सुरू केले. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजपा सरकारला घेरण्यात आले.
Rahul Gandhi has to file a reply in Supreme Court before Monday. The Court fixed the matter for further hearing on Monday, April 22. https://t.co/qwEDJxMj86
— ANI (@ANI) April 15, 2019
दरम्यान, 'न्यायालयानेही कबुल केले आहे की चौकीदार चौर आहे' असे काही दिवसांपुर्वी राहुल गांधी यांनी म्हटले होते. राहुल यांच्या या विधानावरून हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. सर्वोच्च न्यायालयाच्या एका विधानाचा आधार घेत राहुल यांनी हे वक्तव्य केले होते. पण त्यामुळे सर्वौच्च न्यायालयाचा अवमान झाल्याचे म्हटले जात आहे. 'चौकीदार चोर है' हे विधान सर्वोच्च न्यायालयाने केले नसल्याचे सांगत याबद्दस स्पष्टीकरण मागितले आहे. आता राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है या विधानाचे स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे.