मस्तीचा डबल डोस, आधी आपआपसात तुंबळ हाणामारी, मग पोलिसांचा लाठीप्रसाद

अशीही फटकेबाजी, आधी एकमेकांविरुद्ध भिडले, मग पोलिसांनी तुडवला

Updated: Jul 10, 2021, 05:58 PM IST
 मस्तीचा डबल डोस, आधी आपआपसात तुंबळ हाणामारी, मग पोलिसांचा लाठीप्रसाद title=

लखनऊ: आधी दोन गटांमध्ये तुफान राडे झाले त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या लोकांना धू धू धुतलं. भाजप आणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे. एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत ही हाणामारी झाली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांना लाठ्यांचा प्रसाद दिला. इतकच नाही तर पोलिसांना हवेत गोळीबारही करावा लागला. 

उत्तर प्रदेशमधील ब्लॉक प्रमुखाच्या 476 जागांसाठी शनिवारी मतदान करण्यात आलं. मतदानादरम्यान काही भागात संघर्ष, गदारोळ आणि गोंधळाचं वातावरण होतं. हमीरपूरमध्ये भाजप आणि सपा कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते खूप आक्रमक झाले होते. त्यावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. 

मिळालेल्या माहितीनुसार मुजफ्फरनगर, अमरोहा, प्रतापगड आणि लखीमपूर खेरी या परिसरात भाजप आणि सपामध्ये वाद झाले. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता भाजप आणि सपाचे समर्थक मारहाण करत आहेत. 

 

मारहाण करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी सध्या उत्तर प्रदेशातील अनेक विभागांमध्ये तणावाचं वातावरण आहे.