बँक अकाऊंट वापरत नसाल तर आजच बंद करून टाका, कारण...

डेड अकाऊंटमुळे तुम्हाला आर्थिक फटकाही बसू शकतो... कसा तोही जाणून घ्या... 

Updated: May 3, 2019, 09:05 AM IST
बँक अकाऊंट वापरत नसाल तर आजच बंद करून टाका, कारण...  title=

मुंबई : आजकाल अनेकांकडे एकाहून अधिक बँक अकाऊंट असतात. खाजगी नोकरदार व्यक्तींची तर नोकरी बदलली की अनेकदा बँक अकाऊंटही बदलतात... काही जण बचतीसाठी दुसरे अकाऊंट उघडतात. परंतु, तुम्ही अशी अकाऊंट उघडून ठेवली असतील आणि ती वापरात नसतील तर अशी अकाऊंट बंद करणंच तुमच्या फायद्याचं ठरेल. 

जास्त सोई - सुविधा मिळतात म्हणून तुम्ही जुन्या बँकेचं अकाऊंट असताना नवीन बँकेत अकाऊंट उघडलं असेल तर साहजिकच जुन्या बँकेतील ट्रान्झॅक्शन अगोदर कमी होत जातात आणि नंतर बंदच होतात. परंतु, तरीही तुमची ही अकाऊंट सुरूच असतात. पण अशा डेड अकाऊंटमुळे तुम्हाला आर्थिक फटकाही बसू शकतो... कसा तोही जाणून घ्या... 

डेड अकाऊंटचे नुकसान

- तुमच्या सॅलरी अकाऊंटवर तीन महिन्यांपर्यंत पगार जमा झाला नाही तर असेल अकाऊंट आपोआपच बचत खात्यामध्ये बदलले जातात. बचत खात्यात त्याचं रुपांतर झाल्यावर तुम्हाला कमीत कमी बॅलन्स या खात्यात राखावा लागतो. जर मिनिमम बॅलन्स राखण्यात तुम्हाला त्याचा आर्थिक भुर्दंड बसू शकतो.

- बँक अकाऊंटसोबत तुमच्याकडे डेबिट कार्डही असेल तर तुम्हाला माहितीच असेल की या डेबिट कार्डच्या वापरासाठी तुम्हाला वार्षिक फी भरावी लागते. तुम्ही हे डेबिट कार्ड वापरत नसाल तर फी कशाला भरताय? बँकेचं अकाऊंटच बंद करून टाका

- काही लोक जुन्या अकाऊंटचा वापर आपली काही बचत राखण्यासाठी करतात. या पैशांवर तुम्हाला ३.५ ते ४ टक्क्यांचं व्याज मिळतं. हेच पैसे तुम्ही फिस्क्ड डिपॉझिटमध्ये वळवले तर त्याचा तुम्हाला ९ टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकेल. 

- १२ महिन्यांपर्यंत कोणतंही ट्रान्झक्शन झालं नाही तर अकाऊंट इन-एक्टिव्ह मानलं जातं... त्यानंतर अशा अकाऊंटला 'डॉर्मेट अकाऊंट'ला पुन्हा वापरत आणण्यासाठी परत एकदा केवायसी (Know Your Customer) अपडेट करावी लागते.

- अशा अकाऊंटसाठी नेट बँकींगही काम करत नाही