कर्जमाफीवरून पवारांच्या घरी मुख्यमंत्र्यांची बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. 

Updated: Jun 23, 2017, 09:14 AM IST
कर्जमाफीवरून पवारांच्या घरी मुख्यमंत्र्यांची बैठक  title=

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. 

शेतकरी कर्जमाफी प्रकरणी ही भेट होणार असल्याचं सांगितलं जातंय. पवार यांच्या ६ जनपथ निवासस्थानी ही बैठक होणार आहे.

या बैठकीला मुख्यमंत्री आणि पवारांसह अजित पवार, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे उपस्थित असतील. 

कर्जमाफीवरून सुकाणू समितीशी चर्चा न करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. त्यामुळे आता राजकीय पक्षांशी चर्चा करून कर्जमाफीचा मुद्दा संपवण्यावर फडणवीस यांनी भर दिलाय.