कोरोनाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा मोठा निर्णय

 मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचं महत्त्वाचं पाऊल

Updated: Mar 30, 2020, 07:04 PM IST
कोरोनाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा मोठा निर्णय  title=

अमरावती : देशभरात कोरोनाचा कहर वाढत असताना सरकार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्व करत आहे. कोविड-19 चं संक्रमण रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आधीच पंतप्रधान मोदींनी जाहीर केला आहे. पण राज्य सरकार देखील वेगवेगळ्या प्रकारे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यात कोरोनाचा आणखी प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नियम कडक करण्यात आले आहेत. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

पण देशात रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. जर देशात अशीची संख्या वाढत राहिली तर शासकीय रुग्णालयं देखील कमी पडतील. त्यामुळे आंध्रप्रदेशीमधील जगनमोहन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सर्व खासगी रुग्णालय आणि त्यांच्या स्टाफवर नियंत्रणासाठी आदेश जारी केला आहे. याचा अर्थ सरकार सर्व खासगी रुग्णालयं आपल्या ताब्यात घेणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर आता जिल्हाधिकारी सर्व खासगी रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वार्ड बनवण्यासाठी आदेश देऊ शकतात. ज्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींवर तेथे उपचार करण्यात येतील. आंध्र प्रदेशात आतापर्यंत २३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.