Train Ticket: भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. (Indian Railway) येथे दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आपल्या सेवेत सातत्याने सुधारणा करत आहे. नुकतीच रेल्वेने प्रवास करणाऱ्या करोडो प्रवाशांना मोठी बातमी दिली आहे. आता तुम्हाला चालत्या ट्रेनमध्येही कन्फर्म सीट (Confirm Train Ticket) मिळेल. तुम्हाला सीटची काळजी करण्याची गरज नाही. त्यासाठी रेल्वेने नवीन तंत्रज्ञान सुरु केले आहे. त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.
रेल्वेच्या या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रवाशांना वेटिंगसाठी किंवा आरएसी तिकीट (RAC Ticket) कन्फर्म करण्यासाठी कोणत्याही टीटीईच्या (TTE) फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. रेल्वेच्या हँड होल्डिंग डिव्हाइसच्या (HHT) मदतीने ही सुविधा उपलब्ध होणार आहे. रिकाम्या जागा या मशीन्समधून रिअल टाइम अपडेट केल्या जात आहेत. याचा थेट फायदा प्रवाशांना होत आहे. याचा वापर करून दररोज हजारो प्रवाशांची तिकिटे कन्फर्म होत आहेत.
एखाद्या प्रवाशाने काही कारणास्तव रेल्वेमधून प्रवास केला नाही तर त्याची सीट रिकामीच राहते. यापूर्वी टीटीई ही रिक्त जागा प्रतीक्षा करणाऱ्या व्यक्तीला देत असे. पण आता रिकाम्या जागेची माहिती एचएचटी यंत्राने मिळणार आहे. रेल्वेमध्ये कोणतीही सीट रिकामी असल्यास ती वेटिंग किंवा आरएसी प्रवाशाला उपलब्ध होईल. यामुळे प्रवाशांची खूप सोय होणार आहे. त्यांना चालत्या रेल्वेमध्ये कन्फर्म तिकीट मिळणार आहे.
हे नवीन तंत्रज्ञान रेल्वेने गेल्या महिन्यात सुरु केले होते. एचएचटी (HHT) मशीन हे आयपॅडसारखे आहे. त्यात प्रवाशांचा तक्ता असतो. हा चार्ट सतत अपडेट केला जातो. याच्या मदतीने वेटिंग, आरएसी आणि रद्द केलेल्या सीटची माहिती अपडेट होत राहते. ही सुविधा रेल्वेच्या आरक्षण प्रणालीशी जोडलेली आहे. त्यामुळे त्यावर अपडेट केलेली माहिती 100 टक्के बरोबर आहे.