'पंतप्रधानांच्या दबावामुळे माझ्यावर निशाणा साधलात', राहुल गांधींचे पर्रिकरांना उत्तर

 आता राहुल यांनी पर्रिकरांना उत्तर दिले आहे.

Updated: Jan 31, 2019, 09:06 AM IST
'पंतप्रधानांच्या दबावामुळे माझ्यावर निशाणा साधलात', राहुल गांधींचे पर्रिकरांना उत्तर  title=

नवी दिल्ली : गोव्यात सुट्टीसाठी गेलेल्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची अनौपचारीक भेट घेतली. या भेटीदरम्यान आपल्यात राफेल करारा संदर्भात चर्चा झाल्याचे राहुल यांनी म्हटले होते. यानंतर पर्रिकरांनी नाराज होऊन शिष्टाचाराचा वापर राजकारणासाठी करु नका असे म्हणत राहुल गांधी यांच्यावर पत्र लिहून निशाणा साधला. पण आता राहुल यांनी पर्रिकरांना उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावामुळेच आणि त्यांच्याप्रती असलेल्या निष्ठेमुळेच तुम्ही माझ्यावर निशाणा साधलात असे राहुल यांनी पत्राला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. 

'तुम्ही मला पत्र लिहिलात आणि ते मी वाचण्याआधीच माध्यमांमध्ये लीक केलात यामुळे मी आश्चर्यचकीत आहे.

Image result for rahul gandhi zee news

 

मी सन्मानपूर्वक सांगू इच्छितो की माझी आणि तुमची भेट संपूर्णपण खासगी होती. अमेरिकेत तुमच्यावर उपचार सुरु असताना देखील मी तुमच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी संपर्क केला होता', असेही राहुल यांनी म्हटले आहे. 

राजकारणासाठी आजारी व्यक्तीचा वापर करण्याची वृत्ती चांगली नव्हे- पर्रिकर

राहुल यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधत म्हटले, 'मी जनतेचा प्रतिनिधी आहे. राफेल करारात एका भ्रष्ट पंतप्रधानाच्या बेईमानीवर हल्ला चढवणे माझा अधिकार आहे. मी अशाच गोष्टी सांगितल्या ज्या सार्वजनिक पटलावर आहेत. मी आपल्या भेटी दरम्यानची कोणतीच बाब सार्वजनिक केली नाही. मला तुमच्या तब्बेतीबद्दल सहानभूती आहे. मला माहिती आहे काल आपल्या भेटीनंतर तुमच्यावर किती दबाव आला असेल. या दबावामुळे पंतप्रधान आणि त्यांच्या सहकार्यांप्रति निष्ठा दाखवण्यासाठी तुम्हाला माझ्यावर निशाणा साधावा लागला आहे.'

राजकारणासाठी आजारी व्यक्तीचा वापर करण्याची वृत्ती चांगली नव्हे- पर्रिकर

राहुल यांनी पर्रिकरांना लवकरात लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या. बराच काळ आजारातून जात असलेल्या पर्रिकरांनी राहुल गांधींवर आरोप केला होता की, 5 मिनिटांच्या भेटीत राहुल गांधींसोबत राफेल करारासंदर्भात कोणतीही बोलणी झाली नाहीत.

29 जानेवारीला ते कोणतीही पूर्वसुचना न देता माझ्या तब्ब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते. एखाद्या आजारी माणसाची विचारपूस करणे ही आपली संस्कृती आहे. मी त्याच हेतूने तुमचे स्वागत केले पण तुम्ही या भेटीचे राजकारण केले असे सकाळी माध्यमांमधून कळाले असे पर्रिकारंनी म्हटले होते.