भय्यू महाराजांच्या आत्महत्येच्या सीबीआय चौकशीची मागणी

आध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांनी आत्महत्या केली आहे.

Updated: Jun 12, 2018, 04:26 PM IST
भय्यू महाराजांच्या आत्महत्येच्या सीबीआय चौकशीची मागणी

इंदूर : आध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांनी आत्महत्या केली आहे. इंदूरच्या आश्रमात भैय्यू महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. भय्यू महाराजांनी उजव्या कानशिलात गोळी झाडल्याचं बोललं जात आहे. स्वत:वर गोळी झाडल्यानंतर भय्यू महाराजांना इंदूरच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. भय्यू महाराजंच्या आत्महत्येला काही तास होत नाहीत तोच आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

सीबीआय चौकशीची मागणी

सरकारनं भय्यू महाराजांवर पाठिंबा देण्यासाठी दबाव आणला होता. यासाठी भय्यू महाराजांना आमिषही दाखवण्यात आली. ही आमिषं भय्यू महाराजांनी नाकारली. या सगळ्या प्रकारामुळे भय्यू महाराजांवर प्रचंड मानसिक दबाव होता. त्यामुळे याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते मानक अगरवाल यांनी केली आहे.

भय्यू महाराजांची मंत्री म्हणून नियुक्ती

मध्य प्रदेशमधल्या शिवराज सिंह चौहान सरकारनं काही अध्यात्मिक गुरूंची मंत्री म्हणून नियुक्ती केली होती. नर्मदा नदी स्वच्छतेचं अभियान हे धर्मगुरू राबवणार होते. या गुरूंमध्ये भय्यू महाराज यांच्या नावाचाही समावेश होता.