नवी दिल्ली : गुजरातच्या उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक होत आहे. गुजरात विधानसभेची पहिली यादी आज प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
या बैठकीला राहुल गांधी, अशोक गहलोत, अहमद पटेल, जनार्दन द्विवेदी, मोतीलाल व्होरा, ए के एंटोनी, अंबिका सोनी, मुकुल वासनिक, बाळासाहेब थोरात यांच्यासह २० पेक्षा जास्त नेते उपस्थित आहेत.
गुजरात निवडणूकीसाठी ७०-८० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होऊ शकते. त्यासंदर्भातली घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून, गुजरात विधानसभा जिंकण्याविषयी काँग्रेसच्या आशा पल्लवित होत असल्याचं दिसून येत आहे.
आरक्षण न मिळाल्याने पटेल समाजाचा देखील भाजपवर रोष आहे, यात हार्दिक पटेल आणि राहुल गांधी यांच्यातील अप्रत्यक्ष मैत्रीमुळे गुजरात विधानसभा आणखीनच चर्चेत आली आहे.