लोकसभा निवडणूक २०१९ : काँग्रेसची चौथी यादी जाहीर

 आगामी लोकसभा २०१९ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे.  

ANI | Updated: Mar 17, 2019, 12:06 AM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : काँग्रेसची चौथी यादी जाहीर title=

नवी दिल्ली : आगामी लोकसभा २०१९ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. ही २७ उमेदवारांची यादी काँग्रेसने आज उशिरा प्रसिद्ध केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने हे उमेदवार जाहीर केले आहेत. केरळमधून बारा, उत्तर प्रदेशमधील सात,  छत्तीसगढमधून पाच तर अरुणाचल प्रदेश दोन आणि अंदमान आणि निकोबार बेटमधून एका उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. 

LokSabha Elections 2019 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

दरम्यान, दुसऱ्या यादीत भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नाना पटोले यांना महाराष्ट्रात नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर राज बब्बर यांना मोरादाबाद येथून तर भाजपच्या माजी खासदार सावित्री फुले यांना बहराईच (उत्तर प्रदेश) उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुंबईतून माजी खासदार प्रिया दत्त, मिलिंद देवरा यांना या यादीत स्थान देण्यात आली आहे.