LokSabha Elections 2019 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

लोकसभा २०१९ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत नाना पटोले, प्रिया दत्त यांना स्थान देण्यात आले आहे.

ANI | Updated: Mar 13, 2019, 10:42 PM IST
 LokSabha Elections 2019 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर title=

नवी दिल्ली : लोकसभा २०१९ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. ही २१ उमेदवारांची दुसरी यादी काँग्रेसने प्रसिद्ध केली आहे. दुसऱ्या यादीत भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नाना पटोले यांना महाराष्ट्रात नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर राज बब्बर यांना मोरादाबाद येथून तर भाजपच्या माजी खासदार सावित्री फुले यांना  बहराईच (उत्तर प्रदेश) उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर-मध्य मुंबईतून माजी खासदार प्रिया दत्त यांना या यादीत स्थान देण्यात आली आहे.

काँग्रेसची पहिली यादी जाहीर

गडचिरोलीतून डॉ. नामदेव उसेंदी, दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा तर सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Congress releases another list of 21 candidates. Nana Patole to contest from Nagpur. Raj Babbar to contest from Moradabad, former BJP MP Savitri Phule to contest from Bahraich(UP). Priya Dutt to contest from Mumbai North-Central. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/50HUZD2NqW

— ANI (@ANI) March 13, 2019

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. पहिल्या यादीतच युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीतून तर सोनिया गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने लोकसभेच्या १५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात उत्तर प्रदेशातल्या ११ आणि गुजरातमधील ४ उमेदवारांचा समावेश आहे. आता दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.