बँकेवरचा सर्वात मोठा दरोडा हाणून पाडणाऱ्या सुरक्षा रक्षकावर पैशांचा पाऊस

अॅक्सिस बँकेवर पडलेला देशातील सर्वात मोठा दरोडा अयशस्वी केल्यामुळे सुरक्षा रक्षकावर पैशांचा पाऊस झाला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 8, 2018, 12:22 PM IST
बँकेवरचा सर्वात मोठा दरोडा हाणून पाडणाऱ्या सुरक्षा रक्षकावर पैशांचा पाऊस title=

जयपूर : अॅक्सिस बँकेवर पडलेला देशातील सर्वात मोठा दरोडा अयशस्वी केल्यामुळे सुरक्षा रक्षकावर पैशांचा पाऊस झाला आहे.

दरोडा हाणून पाडला

पोलीस सीसीटीव्हीच्या आधारावर बँकेवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांचा शोध घेत आहे. वेगवेगळ्या पोलिसांच्या टीम याची कसून चौकशी करत आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील पोलीस देखील यांचा शोध घेत आहेत. पण बँकेची रक्षा करणाऱ्या त्या सुरक्षा रक्षकाला मात्र बँकेने बक्षीस जाहीर केलं आहे.

सुरक्षा रक्षकाला बक्षीस

बँकेच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस कमिश्नर यांच्या सोबत बैठक झाली. दरोडेखोरांचा अजूनही कोणताही शोध लागलेला नाही. पोलीस बँकेच्या आसपासच्या मोबाईल नेटवर्कवरुनही त्यांचा शोध घेत आहेत. बँकेतील जवळपास 925 कोटींची रक्कम वाचवणाऱ्या सिताराम या सुरक्षा रक्षकाला बँकेने 15 लाखांचं बक्षीस दिलं आहे.