मोदींनी लोकसभेत मांडलेल्या भूमिकेबाबत का म्हणतोय "कॉमन मॅन"?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत मांडलेल्या भूमिकेबाबत का म्हणतोय कॉमन मॅन?

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 8, 2018, 12:36 PM IST
मोदींनी लोकसभेत मांडलेल्या भूमिकेबाबत का म्हणतोय "कॉमन मॅन"? title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत मांडलेल्या भूमिकेबाबत का म्हणतोय कॉमन मॅन?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेलं भाषण वेगवेगळ्या कारणांनी गाजतंय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला पंतप्रधान मोदींनी उत्तरे दिले. यावेळी संपूर्ण भाषणात मोदींना विरोधकांनी कडाडून विरोध केला. त्या घोषणाबाजीतचं मोदींचे भाषण सुरू होते. या संपूर्ण भाषणावर झी चोवीस तास डॉट कॉमने कॉमन मॅनला म्हणजे या सामान्य जनतेला पोलच्या माध्यमातून प्रश्न विचारला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत मांडलेल्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का?  या प्रश्नावर अनेकांनी आपली मते नोंदवली आहेत.

झी चोवीस तास डॉट कॉमने सुरू केलेल्या पोलमध्ये नागरिकांनी आपलं मते नोंदवली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत मांडलेल्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? असा प्रश्न विचारला असता एकूण 1 हजाराहून अधिक मत नोंदवण्यात आली. यामध्ये 545 लोकांनी सहमती दर्शवली आहे तर 581 लोकांनी नाही असं आपलं मत दर्शवलं आहे. त्याचप्रमाणे सामान्यांनी या पोस्टखाली अनेक प्रश्न देखील विचारले आहेत. या पोलद्वारे पुन्हा एकदा 15 लाखाचा मुद्दा चर्चेत आला. काहींनी मोदींना पाठिंबा दिला आहे तर काहींनी मोदींच्या कामावर प्रश्न उभे केले आहेत.

लोकसभेतील मोदींच्या भाषणातील मुद्दे 

'तीन तलाक' विधेयकावर...
सायंकाळी ४ वाजल्याच्या सुमारास पंतप्रधान मोदींनी राज्यसभेला संबोधित केलं. 'तीन तलाक' विधेयकाला ब्रेक लावण्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसला धारेवर धरलं. 'जर हिंदू व्यक्ती दोन विवाह करून तुरुंगात गेला तर त्याच्या कुटुंबाचं पालन-पोषण कोण करणार?' असा प्रश्न त्यांनी संसदेत उपस्थित केला. 

'तीन तलाक'च्या विधेयकात असा तलाक देणाऱ्या व्यक्तीला तुरुंगाची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी तरतूद करण्यात आली होती. त्यावर, आरोपी तुरुंगात गेला तर पीडित महिलेचं पालन-पोषण कोण करणार? असा प्रश्न उपस्थित करत या विधेयकाला राज्यसभेत ब्रेक लागला होता.

काँग्रेसमुक्त भारत?
काँग्रेसच्या 'नेम चेंजर' टीकेला प्रत्युत्तर देताना आपला 'नेम चेंजर' नाही तर 'ऐम चेंजर' म्हणजेच लक्ष्यचा पाठलाग करण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी म्हटलं. 

काँग्रेसनं कधीही लाल किल्ल्यावरून दुसऱ्या सरकारचं कौतुक केलं नाही... पण मी ते केलं... भाजपवर टीका करता करता तुम्ही भारतावर टीका सुरू करता... मोदीवर हल्ला करताना तुम्ही हिंदुस्तानावर हल्ला करता' असंही आपल्या भाषणात मोदींनी म्हटलंय. 

इतक्यावरच ते थांबले नाहीत तर 'तुम्हाला गांधीजी वाला भारत हवाय, मलाही गांधीजी वाला भारत हवाय. गांधीजींनी म्हटलं होतं, आता स्वातंत्र्य मिळालंय आता काँग्रेसची गरज नाही' असं म्हणत त्यांनी 'काँग्रेसमुक्त भारता'ची री ओढलीय.