नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये दारु विक्री सुरु ठेवावी ही मद्यपींची मागणी अनेक शहरांमध्ये मान्य करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले गेल्याने काही भागात पुन्हा दारुबंदी लागू करण्यात आली. पण अनेक ठिकाणी नियम व अटींसह पुन्हा सुरु करण्यात आली. दिल्ली सरकारने देखील दारुबंदी करण्याऐवजी त्यावर पर्याय आणला आहे.
दारूच्या दुकानासमोर वाढलेली गर्दी पाहता आता दिल्ली सरकारने गर्दी कमी करण्यासाठी नवा पर्याय काढला आहे. दिल्ली सरकारने दारूसाठी ई पास देण्याची सुविधा केलीय. आता थेट ग्राहकांच्या मोबाईलवर ई पास मिळणार आहे. त्यासाठी www.qtoken.in नावाची वेबसाईट तयार करण्यात आली आहे.
या वेबसाईटवर जाऊन मोबाईल नंबर टाकले की लगेच टोकन नंबर टाकता येणार आहे. ते टोकन नंबर घेऊन दिलेल्या वेळेत दुकानात जाऊन दारू घेता येणार आहे. त्यामुळे आता दारूसाठी मद्यपींना रांगेत उभारण्याची आवश्यकता नसणार आहे.