प्रजासत्ताक दिनावर कोरोनाचे सावट, यंदा असे असतील बदल

कोरोनामुळे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावर परिणाम

Updated: Dec 29, 2020, 09:41 PM IST
प्रजासत्ताक दिनावर कोरोनाचे सावट, यंदा असे असतील बदल title=

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनावरही यंदा कोरोनाचे सावट आहे. परेड केवळ विजय चौक ते नॅशनल स्टेडियमपर्यंत होणार आहे. तर उपस्थितांची संख्या 1 लाखांवरून 25 हजारांवर करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. तसेत प्रत्येक संचलन तुकडीत केवळ 96 सैनिक असणार आहेत.

यंदा प्रजासत्ताक दिनी संचलनावर मर्यादा येणार आहेत. राजपथ ते लाल किल्ल्यापर्यंत ८.२ किमीपर्यंत चालणारी परेड यंदा विजय चौक ते नॅशनल स्टेडियम अशी ३.३ किमीवर आणली आहे. तसंच प्रत्येक पथसंचलनातील प्रत्येक तुकडीत १४४ सैनिकांएवजी 96 सैनिकांचाच सहभाग असेल. 

कोरोनामुळे गर्दी टाळण्याच्या पार्श्वभूमीवरही उपस्थितांची संख्याही मर्यादित करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ३२ हजार लोकं प्रजासत्ताकदिनी तिकिटं घेऊन उपस्थित होते यंदा केवळ 7500 लोकांना तिकिटं देण्यात आली आहेत. तसंच इतर उपस्थितांची संख्याही १ लाखांवरून २५ हजारांवर आणली आहे. यंदा परेडमध्ये लहान मुलं सहभागी होणार नाहीत. यंदा कोव्हीड प्रोटोकॉलचंही काटेकोरपणे पालन केलं जाईल.