राजन्ना सिर्सिल्ला : तेलंगणामधून एक विचित्र घटना समोर आली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या सासूने आपल्या सूनेला जबरदस्तीने मिठी मारली आणि तिला संक्रमित केले. ही घटना राजन्ना सिर्सिल्ला गावची आहे. सोशल मीडियावर सध्या ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.
सासू का चिडली?
द न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सासू घरी क्वांरटाईन होती. क्वारंटाइन नियमांमुळे तिला कंटाळा आला होता. म्हणूनच तिने सुनेलाही कोरोना संक्रमित केले.
पीडित सून म्हणाली की, 'घरातील सदस्यांपासून लांब असल्याने सासूला वाईट वाटत आहे. सासूला घरी एका रुममध्ये क्वांरटाऊन ठेवण्यात आले होते. त्यांना वेळेवर जेवण देण्यात येत होते. कोणालाही त्याच्या खोलीत जाऊ दिले नाही. यामुळे त्या अस्वस्थ झाल्या.'
मिठी मारण्यापूर्वी सासूने काय म्हटले?
एकाकीपणामुळे घाबरून माझ्या सासूने मला जबरदस्तीने मिठी मारली आणि सांगितले की आता तुलाही कोरोना होईल. सूनेला मिठी मारण्यापूर्वी सासूने असेही म्हटले होते की, मी मेल्यानंतर तुम्हाला आनंदाने राहायचं आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच पीडित सूनची बहीण तिच्या सासरच्या घरी आली आणि तिला दोन्ही मुलांसह तिच्या घरी घेऊन गेली. आता पीडित सूनवर बहिणीच्या घरी उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 7 महिन्यांपूर्वी पीडितेचा नवरा ओडिशाला गेला होता, तो तेथे ऑटो ड्रायव्हर म्हणून काम करतो.