कोरोना काळात काम सूटल्याने आईसह मुलीने स्वीकारला देहव्यापाराचा मार्ग

पंजाबमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. मुक्तसर पोलिसांनी एका घरावर छापा टाकला तर, तेथे एक महिला आपल्या मुलीसह दोन पुरूषांसोबत नको त्या अवस्थेत होती.

Updated: Jul 7, 2021, 03:30 PM IST
कोरोना काळात काम सूटल्याने आईसह मुलीने स्वीकारला देहव्यापाराचा मार्ग

लुधियाना : पंजाबमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. मुक्तसर पोलिसांनी एका घरावर छापा टाकला तर, तेथे एक महिला आपल्या मुलीसह दोन पुरूषांसोबत नको त्या अवस्थेत होती. पोलिसांना पाहताच मुलगी आणि आईला घाम फुटला तसेच तेथे असलेल्या पुरूषांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना अटक केली. 

पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यातील मलोट की नानक नगरीमध्ये पोलिसांनी भर वस्तीत छापा मारला. तेथे एक महिला आपली मुलगी आणि दोन पुरूषांसह उपस्थित होती. त्यांना पोलिसांनी देहव्यापार केल्यामुळे अटक केली आहे. या ठिकाणी असा व्यवहार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांना अनेक दिवसांपासून नानक नगरीमध्ये एका महिला आणि मुलीद्वारा देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळत होती. त्याप्रमाणे छापा मारण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर या चौघांना तेथे पकडण्यात आले.

आई आणि मुलीने कोविडच्या संकटात काम बंद झाल्यामुळे देहव्यापार सुरू केल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. त्यांचे कुटूंब आर्थिक विवंचनेत असल्याने त्यांनी हा मार्ग पत्करल्याचे सांगितले जात आहे.

न्यायालयात त्यांना हजर केले जाणार असून, पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.