15 ऑगस्टपर्यंत देशातील 18 वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण

 लसीकरण मोहिमेला आणखी वेग येणार

Updated: Apr 22, 2021, 09:32 AM IST
15 ऑगस्टपर्यंत देशातील 18 वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता केंद्र सरकारने (Central Government) मोठा निर्णय घेतलाय. यानुसार लसीकरण मोहिमेला (Vaccination Campaign) आणखी वेग आणण्यात येणार आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत देशातील 18 वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आलंय. सध्या 45 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरु आहे. 1 मेनंतर 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुले करण्यात आले आहे. त्यासाठी देशात जवळपास 10 लाख लसीकरण केंद्रं उभारण्यात येणार आहेत.

घराघरात जाऊन लसीकरण करण्याबाबतही सरकार विचार करत आहे. आगामी काळात जगभरातील विविध देशातील प्रभावी लस आपल्याला उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलीय.

मुंबईत लसीकरण केंद्र बंदच्या मार्गावर 

मुंबईत १ एप्रिलला सर्वाधिक लसीकरणाची नोंद झाले होते. आणि आता याला महिनाही उलटत नाही तोपर्यंत लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ आलीय. सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. पण हे प्रमाणदेखील निम्म्यावरच आहे. यातही बहुतांश जणांनी पहिला डोसच घेतलाय. दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण साधारणपणे सात टक्के इतके आहे.  ठाणे,पनवेल,नवी मुंबईत लस उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.