कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. वालिया, सीताराम येचुरी यांच्या मुलाचे कोरोनाने निधन

देशात कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे. (Cornavirus in India) नवीन समस्याही येत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यू संख्येत सतत वाढत जात आहे.  

Updated: Apr 22, 2021, 09:18 AM IST
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. वालिया, सीताराम येचुरी यांच्या मुलाचे कोरोनाने निधन
Pic / ANI

मुंबई : देशात कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे. (Cornavirus in India) नवीन समस्याही येत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यू संख्येत सतत वाढत जात आहे. आता दिल्लीचे कॉंग्रेसचे  (Congress) वरिष्ठ नेते आणि पूर्व मंत्री अशोक कुमार वालिया (AK Walia) यांचे निधन झाले. त्यांना कोरोनाला विषाणूची लागण झाल्याचे दिसून आले. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे (CPM) नेते सीताराम येचुरी यांच्या मुलाचेही कोरोनाने निधन झाले. (Congress leader AK Walia passes away due to covid-19 at apollo hospital in delhi)

अपोलो रुग्णालयात सुरु होते उपचार 

दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात एके वालिया (AK Walia)यांनी अखेरचा श्वास घेतला. ते कोरोना विषाणूंविरुद्ध तीन दिवस  लढत होते.  डॉ. अशोक कुमार वालिया हे सलग चार वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी शीला दीक्षित यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले. त्यांनी आरोग्य, नगरविकास, जमीन आणि बांधकाम विभाग यांचा कार्यभार संभाळला आहे.

आशिष यांचे कोरोनाने निधन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPM) नेते सीताराम येचुरी यांचा मुलगा आशिष यांचे गुरुग्राममधील रुग्णालयात कोरोना विषाणूमुळे निधन झाले. स्वत: सीताराम येचुरी यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करताना लिहिले की, 'कोविड-19मुळे आज सकाळी माझा मोठा मुलगा आशिष येचुरी हरवला. ज्यांनी आम्हाला आशा दिली आणि ज्यांनी त्याच्यावर उपचार केले त्यांच्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.