Coronavirus Update: सावधान! ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटची भारतातही चाहूल...

Coronavirus update: सध्या सगळीकडेच ओमायक्रॉनचा सबव्हेरिएंट (omicron in china and america) XBB.1.5 सध्या जगभरात वाढू लागला आहे. यामुळे संपुर्ण जग पुन्हा एकदा चिंतेत आहे. आता याची चाहूल भारतातही लागल्याची दिसून येते आहे. 

Updated: Dec 31, 2022, 11:54 AM IST
Coronavirus Update: सावधान! ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटची भारतातही चाहूल...  title=
File Photo

Coronavirus update: सध्या सगळीकडेच ओमायक्रॉनचा सबव्हेरिएंट (omicron in china and america) XBB.1.5 सध्या जगभरात वाढू लागला आहे. यामुळे संपुर्ण जग पुन्हा एकदा चिंतेत आहे. सध्या सगळेचजण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. परंतु ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंटमुळे सध्या सगळीकडेच हाहाकार माजला आहे. या नव्या व्हेरिएंटचा तडका चीनला बसला असून अमेरिका आणि इतर देशातही याचा फैलाव वेगाने होतो आहे. त्यामुळे आता सगळीकडे सतर्कचा इशारा जारी करण्यात आला आहे. आता याची चाहूल भारतातही येऊ लागली आहे. रिपोर्ट्सनुसार, सध्या गुजरातमध्ये या नव्या व्हेरिएंटचा पहिला (covid cases in india) रूग्ण आढळला आहे. त्यामुळे आपल्या देशातही आता सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

आपल्या देशातही बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवले जात आहे. त्यांची वेळोवेळी तपासणी केली जात आहे. सध्या जगभर वाढत्या रूग्णांची संख्या पाहता मास्क आणि सॅनिटाझर (Mask mandatory) यांची सर्वांनीच दखल आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक ठरले आहे. (coronavirus cases in india omicron varient xbb15 spreding in america china found in gujarat report says)

ओमायक्रॉनचा नवा सब व्हेरिअंट XBB.1.5 नं अमेरिकेसह चीनमध्ये खळबळ उडवून दिली आहे. या व्हेरिअंटचाही पहिला रुग्ण गुजरातमध्ये मिळाला असल्याची माहिती समोर येते आहे. भारतीय SARS Cove-2 Genomics Consortium (INSACOG) च्या आकडेवारीनुसार, Omicron चे XBB.1.5 चा रुग्ण सापडला आहे. चीनमध्ये bf.7 हा व्हेरिएंट पहिल्यांदा रिपोर्ट झाला होता. त्यातून चीनमध्ये या व्हेरिएंटनं हाहाकार माजवायला सुरूवात केली आहे. त्यातच आता या दुसऱ्या व्हेरिएंटनं चीनमध्ये पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. अमेरिकेत XBB.1.5 चे रुग्ण सर्वाधिक आढळले असल्याची माहिती समोर आली आहे. भारतासोबत हा व्हेरिएंट इतर 34 देशांमध्ये पसरला आहे. 

जगात थैमान 

हा व्हेरिएंट अत्यंत धोकादायक आहे. XBB व्हेरिअंट BA.2.10.1 आणि BA.2.75 पासून बनलेला आहे. गुजरात आणि ओडिशामध्ये BF.7 चे रुग्ण सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता ओमायक्रॉनच्या या नव्या व्हेरियंटचा रूग्ण समोर आला आहे. सध्या सगळीकडेच नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला खीळ बसली आहे. ओमायक्रॉनच्या या नव्या व्हेरिएंटमुळे सध्या हाहाकार माजला आहे. त्यामुळे आपल्या सर्वांनाच येत्या काही दिवसात काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे. मास्क आणि सॅनिटाझरचा वापर करणं बंधनकारक ठरले आहे.