'३ मे नंतर कोणतीही सार्वजनिक वाहतूक सुरू होणार नाही'

पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिली माहिती 

Updated: Apr 27, 2020, 03:14 PM IST
'३ मे नंतर कोणतीही सार्वजनिक वाहतूक सुरू होणार नाही' title=

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे दुसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आला. ३ मेपर्यंत संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पहिल्या लॉकडाऊननंतर २० एप्रिलपासून लॉकडाऊनमधील काही नियम शिथिल करण्यात आले. दुसऱ्या लॉकडाऊननंतर कोणत्याही प्रकारची सार्वजनिक वाहतूक सुरू होणार नाही अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिली. 

पंतप्रधानांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत चौथी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यामध्ये त्यांनी रेड आणि ऑरेंज झोन मध्ये व्यवहार सुरू करू नका, ग्रीन झोनमध्ये करू शकता अशी माहिती दिली. याबाबतही राज्याला अधिकार दिले आहेत

पंतप्रधान यांनी आजच्या बैठकीत राज्यात अडकलेल्या मजुरांबद्दल काहीच मत व्यक्त केलं नाही परंतु काही राज्यांनी मजूर पाठवण्याची तयारी दाखवली तर काही राज्यांनी पैसे नसल्यामुळे मजुरांना स्वीकारण्यास उत्सुकता नसल्याचे संकेत दिले. यामुळे पुन्हा एकदा मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आहे. 

३ मे नंतरही सार्वजनिक वाहतूक सुरू न झाल्यास मजुरांचा प्रश्न उभा राहणार आहे. पहिल्या लॉकडाऊननंतर वांद्रे येथे मजुरांनी मोठ्या प्रमाणात आपापल्या गावी जाण्यासाठी गर्दी केली होती. ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून पंतप्रधानांनी सुरूवातीलाच हा मुद्दा स्पष्ट केला आहे. त्यामुळे ३ मे ला लॉकडाऊन संपल्यानंतरही कोणतीही सार्वजनिक वाहतूक सुरू केली जाणार नाही 

ज्या क्षेत्रांमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे तिथे अर्थातच आर्थिक नुकसानही जास्त होणार . २० एप्रिलनंतर आपण काही ठिकाणी शिथिलता आणली पण त्यामुळे आपले आव्हानही वाढले आहे. नक्की कुठले प्रश्न वाढले आहेत ते अभ्यासा. रेड झोनमधून ऑरेंज आणि ऑरेंजमधून ग्रीन झोन मध्ये कसे जायचे याचा नियोजन आवश्यक आहे. हीच सुसंधी आहे सुधारणा घडविण्याची. अनेक जुने आणि किचकट नियम आणि प्रक्रिया बदलण्याची संधी सोडू नका. आपदधर्माचे पालन करा. नीती आणि नियम जुने असतील तर आलेली संधी जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.