कोरोनाचे दोन्ही डोस घेऊनही इंडियन मेडिकलच्या माजी अध्यक्षांचे निधन

एक धक्कादायक बातमी. कोरोनाचे दोन्ही डोस घेऊनही पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल (62) (Dr. K. K. Agarwal ) यांचे काल रात्री  कोरोना संसर्गामुळे (Coronavirus) निधन झाले.  

Updated: May 18, 2021, 12:36 PM IST
कोरोनाचे दोन्ही डोस घेऊनही इंडियन मेडिकलच्या माजी अध्यक्षांचे निधन

मुंबई : एक धक्कादायक बातमी. कोरोनाचे दोन्ही डोस घेऊनही इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल (62) (Dr. K. K. Agarwal ) यांचे काल रात्री  कोरोना संसर्गामुळे (Coronavirus) निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार होते. तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. (Padma Shri Dr. K. K. Agarwal died of corona infection)

अग्रवाल यांनी दोन महिन्यांपूर्वी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. परंतु गेल्या महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अग्रवाल यांनी 28 एप्रिल रोजी कोरोना बाधित असल्याचे माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवर  दिली होती.

 कोरोना कालावधीत त्यांनी मदतही केली होती. त्यांनी हजारो लोकांना संकटकाळी मदत केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर त्यांनी विनामूल्य उपचार केले. कोरोना संकटाच्यावेळी ते नेहमी फ्रंट लाईन वॉरियर्स म्हणून पुढे आले आणि मदत करत राहिले. मात्र, दुर्दैवाने त्यांना कोरोनाने गाढले आणि त्यांची आयुष्याची लढाई ते हरलेत. त्यांना २०१० मध्ये देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या 'पद्मश्री' पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते.