एसीमुळे कोरोनाचा धोका वाढतो? जाणून घ्या काय आहे तज्ञ्जांचं म्हणणं

कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. 

Updated: Apr 21, 2020, 02:31 PM IST
एसीमुळे कोरोनाचा धोका वाढतो? जाणून घ्या काय आहे तज्ञ्जांचं म्हणणं title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. यादरम्यान एक गोष्ट सतत चर्चेत आहे ती म्हणजे, वाढता उन्हाळा कोरोनाचा संसर्ग अधिक होण्याचं कारण आहे का? याबाबत सेंटर फॉर सायन्स एन्ड एनव्हायर्नमेंट म्हणजेच सीएसई (CSE) या अभ्यासातून असं समोर आलं की, गरमीच्या दिवसांत सेंट्रलाइज एअर कंडीशनर काही प्रमाणात कोरोनाचा धोका वाढवू शकतो. ऐवढंच नाही तर ज्या घरांत एसी सुरु असतो, तिथे हवेचं व्हेंटिलेशन, हवा खेळती असणं गरजेचं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तापमान 40 डिग्री पार करु शकतो. अशात लोकांना एसीची सर्वाधिक गरज लागू शकते. CSEने आपल्या अभ्यासात, मोठ-मोठ्या बिल्डिंग आणि ऑफिसमध्ये असणारे सेंट्रलाइज्ड एसी कोरोना व्हायरसच्यादृष्टीने धोकादायक ठरु शकते.

अध्ययनानुसार, एसीमुळे आतली हवा आतच लॉक होते आणि एसीद्वारे आतच फिरत राहते. अशात एक व्यक्ती जरी कोरोनाबाधित आढळला तर हा कोरोनाचा संसर्ग इतर लोकांमध्ये पसरण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वाढते. 

CSEनुसार, आपल्या देशात घरांची बांधणी संपूर्ण व्हेंटिलेशन असेल अशाप्रकारची असते. ज्या घरांमध्ये कोरोनाबाधित एकही रुग्ण नाही, तिथे काही वेळासाठी एसी लावला जाऊ शकतो, परंतु घरात एसी लावताना काही प्रमाणात बाहेरची हवा खेळती राहील अशाप्रकारे व्हेंटिलेशन ठेवणं गरजेचं आहे.

तज्ञ्जांचा असा विश्वास आहे, या दिवसांत एसीचा वापर शक्यतो करु नये. घर आणि बिल्डिंगमध्ये व्हेंटिलेशन आणि ऊन येणं गरजेचं आहे. आपलं शरीर 32 डिग्री तापमानापर्यंत गरमी सहन शकतो. गरज नसल्यास एसी न लावता पंखा लावावा.