देशातील पहिलं 'गार्बेज कॅफे'; प्लास्टिक आणा आणि मोफत जेवण करा

देशातील पहिलं 'गार्बेज कॅफे, जाणून घ्या काय आहे हा उपक्रम

Updated: Oct 9, 2019, 12:42 PM IST
देशातील पहिलं 'गार्बेज कॅफे'; प्लास्टिक आणा आणि मोफत जेवण करा title=

अंबिकापूर : अंबिकापूरमध्ये (Ambikapur) आजपासून देशातील पहिलं गार्बेज कॅफे (Garbage Cafe) सुरु होणार आहे. आरोग्य मंत्री टीएस सिंहदेव, गार्बेज कॅफेचं उद्घाटन करणार आहे. या गार्बेज कॅफेमध्ये रस्त्यावरील प्लास्टिक आणून दिल्यास जेवण मोफत मिळण्याची सुविधा मिळणार आहे.

प्लास्टिकमुळे पर्यावरणाला होणारं नुकसान रोखण्यासाठी छत्तीसगढमध्ये हे पाऊल उचलण्यात आलं आहे. छत्तीसगढमधील अंबिकापूरनगर निगमने प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात नागरिकांना मोफत जेवण उपलब्ध करुन देण्यात येण्यासाठी गार्बेज कॅफे सुरु करण्यात आला आहे. 

गार्बेज कॅफे २४ तास सुरु राहणार आहे. गार्बेज कॅफे सुरु होण्याआधीच हा चर्चेचा विषय बनला आहे. या अनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

१ किलो प्लास्टिक आणल्यास, एकवेळचं भरपेट जेवण मिळणार आहे. तर ५०० ग्रॅम प्लास्टिक आणल्यास ब्रेकफास्ट मोफत मिळणार आहे.

या कॅफेमधून जमा होणारं प्लास्टिक रस्ते बनवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. याआधी देखील शहरात प्लास्टिकचे तुकटे आणि डांबरपासून रस्ते बनवण्यात आले होते. बजेटमध्ये या गार्जेब कॅफेसाठी ५ लाख रुपये देण्यात आले आहेत. या अंतर्गत नगर निगम गरीब आणि बेघर लोकांना मोफत जेवण देण्यात येणार आहे.