Corona Forth Wave : चीन आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. ज्यामुळे जगावर पुन्हा एकदा कोरोनाचं नवं संकट उभं राहत आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावासाठी नवा व्हेरिएंट (Corona new verient) जबाबदार असल्याचं पुढे येतं आहे. अनेक देशांमध्ये हा नवा व्हेरिएंट आढळला आहे. ज्यामुळे आता कोरोनाच्या चौथ्या लाटेची (Corona Fourth Wave) शक्यता वर्तवली जात आहे. (Forth wave chances in India)
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामागे ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट BA2 व्हेरिएंट आहे. जो कमीत कमीत 12 लोकांना संसर्ग करण्याची क्षमता ठेवतो. दक्षिण कोरियामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होते आहे. ब्रिटन आणि इतर युरोपातील देशांमध्ये नवा व्हेरिएंट आढळल्याने चौथ्या लाटेची शक्यता येण्याची शक्यता आहे. युरोपमध्ये एकाच दिवसात 6 लाखाहून अधिक प्रकरणे नोंदवली गेल्याने चिंतेचं वातावरण आहे. भारतात चौथी लाट येणार का याबाबत अजून कोणतीही शक्यता सरकारकडून वर्तवली गेली नसली तर देखील सरकार अलर्ट आहे. सरकार सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहे.
एक्सपर्ट म्हणतात की, डिसेंबर 2021 आणि फेब्रुवारी 2022 दरम्यान तिसरी लाट आली होती. पण या दरम्यान मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं होतं. ज्यामुळे याचा मोठा प्रभाव नंतर दिसला नाही. परिस्थिती नियंत्रणात आली. इतर देशांमध्ये कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता भारतात देखील आता याबाबत सतर्कता बाळगली जात आहे. बाहेरुन येणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी (Corona Testing) करण्य़ाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ओमायक्रॉनचे 50 हून अधिक म्यूटेशन
कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचे 50 हून अधिक म्यूटेशन झाले आहेत. जगभरात या व्हेरिएंटने संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. अनेकांना जीव गमवावा लागला. भारतात सध्या कोरोनाच्या चौथ्या लाटेची कोणतीही परिस्थिती दिसत नसली. तरी काळजी घेण्याची अधिक गरज आहे. मास्क वापरला पाहिजे. असं एक्सपर्टचं मत आहे.