Covid 19 चौथ्या लाटेबाबत मोठा दिलासा, पाहा काय म्हणाले ICMR चे एक्सपर्ट

देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत लोकांची चिंता वाढू लागली होती. पण एक्सपर्ट यांनी मोठा दिलासा दिला आहे.

Updated: Apr 20, 2022, 07:14 PM IST
Covid 19 चौथ्या लाटेबाबत मोठा दिलासा, पाहा काय म्हणाले ICMR चे एक्सपर्ट title=

Covid Fourth Wave : देशात कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता लोकांची चिंता वाढू लागली आहे. अशा स्थितीत चौथी लाट लवकरच दार ठोठावण्याची शक्यता लोक वर्तवत आहेत. पण ICMR मधील एपिडेमियोलॉजी आणि कम्युनिकेबल डिसीजचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. रमण आर. गंगाखेडकर यांनी दिलासा देणारी बातमी दिली आहे.

चौथ्या लाटेची भीती नाकारली

ते म्हणाले की, 'मला वाटत नाही की चौथी लाट येईल. BA.2 प्रकार जगभरातील लोकांना प्रभावित करते. आपल्यापैकी काहींनी मास्कचा वापर अनिवार्य नसल्याचा गैरसमज केला गेला आहे.

मास्क वापरणे अजूनही आवश्यक 

ते म्हणाले की अद्याप कोणताही नवीन प्रकार समोर आलेले नाही. जे वृद्ध आहेत, ज्यांनी लसीकरण केलेले नाही, ज्यांना आतापर्यंत संसर्ग झाला आहे, त्यांनी फेस मास्क वापरावा.

शाळा बंद करण्याची गरज नाही

शाळा बंद करण्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, शाळा बंद करू नये कारण यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि विकासाला बाधा पोहोचेल. 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विद्यार्थ्यांना, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांनी शक्य तितक्या लवकर लसीकरण केले पाहिजे.