नवी दिल्ली : कोरोना आजारामुळे रोजगाराचा प्रश्न उभा राहिला आहे. लाखो लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. तर ज्या लोकांच्या नोकऱ्या सुरू आहेत. त्यांच्या पगारांमध्ये कपात करण्यात आली आहे. अनेक कंपन्यांनी नवीन भरतीसुद्धा बंदच ठेवली आहे.
एका संशोधन अहवालातून ही बाब समोर आली आहे की, 'कोरोनामुळे फ्रेशर्स लेवलवर कायमस्वरूपी (Permanent ) नोकरीची इच्छा असणाऱ्यांना मोठा झटका लागण्याची शक्यता आहे. परंतु तात्पुरत्या (temporary) नोकऱ्यांना प्राधान्य येणार आहे'.
या संशोधनासाठी केलेल्या ऑनलाईन सर्वेमध्ये 28 मे पासून ते 30 जूनपर्यंत सर्व सेक्टरच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली होती. वर्षाच्या सुरूवातील आर्थिक वृद्धी होत होती. कर्मचाऱ्यांची भरती देखील होत होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा आर्थिक चक्राला खीळ बसली.
या सेक्टर्सवर वाईट परिणाम
सध्याच्या परिस्थितीत कायमस्वरूपी नोकरदारांपेक्षा तात्पुरते नोकरदार जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतील. ई-कॉमर्स सेक्टरमध्ये त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. सर्वेच्या मानाने 69 टक्के लोकांच्या मते पर्यंटन आणि हॉटेलींग क्षेत्रावर सर्वात जास्त परिणाम झाला आहे. तर मॅन्युफॅक्चरीग,मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रालाही झळ बसली आहे.